breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शॉर्टसर्किटमुळे नेहरुनगरच्या सराफ दुकानाला आग

पिंपरी (महा ई न्यूज ) : पिंपरीतील  नेहरूनगर येथील शिवम ज्वेलर्स या सराफ दुकानाला आज (शनिवारी) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी दुकानाची काच फुटून तीन जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत संत तुकारामनगरच्या मुख्य अग्निशामक दलास माहिती देवून पाचारण करण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात शिवम ज्वेलर्स हे सराफ दुकान आहे. त्या शिवम ज्वेलर्स या सराफाच्या दुकानाला बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. यावेळी दुकानातील धूर बाहेर काढण्यासाठी काच काढत असताना काच फुटून झालेल्या अपघातामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button