breaking-newsपुणे

आरटीई’ प्रवेशासाठी 17 मार्चला लॉटरी

पुणे |महाईन्यूज|

बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशासाठी येत्या 17 मार्चला लॉटरी काढण्यात येणार आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यंदा लॉटरी काढण्यासाठी जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही प्रवेशाची लॉटरी काढण्यात येणार आहे.

“आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. या प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 331 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 482 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या प्रवेशाच्या जागांसाठी 2 लाख 91 हजार 656 पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. पुणे जिल्ह्यातील 972 शाळांमध्ये 16 हजार 949 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या जागांसाठी 62 हजार 943 अर्ज दाखल झालेले आहेत.

दरवर्षी मोठ्या हॉलमध्ये प्रवेशाच्या लॉटरी काढण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदा मात्र हा कार्यक्रम होणार नाही, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. सकाळी 11 ते 4 यावेळेत व्हिडीओ कॉन्फरन्स्गिद्वारे प्रवेशाची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॉटरी काढण्याची प्रक्रिया पाहता येणार आहे. लॉटरी काढल्यानंतर व प्रतिक्षा यादीची माहिती पालकांना 19 मार्चला दुपारनंतर “एसएमएस’वर प्राप्त होणार आहे. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये, असेही जगताप यांनी सूचीत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button