breaking-newsपिंपरी / चिंचवड

शैक्षणिक शूल्क भरण्यासाठी पालकांना शाळांकडून जबरदस्ती नको – संकेत चोंधे

  • शैक्षणिक संस्थांचा मनमानी कारभार कदापी सहन करणार नाही
  • राज्य सरकारने अंकूश लावावा, अन्यथा रस्त्यावर उतरणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या काळातील शाळेंच्या व शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभारावर राज्य सरकारने अंकुश लावावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे. त्यामध्ये संकेत चोंधे यांनी म्हटले आहे की, एकीकडे कोरोनारुपी महामारीने सर्व जग त्रस्त असताना शाळेचं व शैक्षणिक संस्थांचं अवाजवी शुल्क वाढ करणे आणि सक्तीची शुल्क वसुली करणे हा सामान्य नागरिंकावर होणार अन्याय आहे. राज्य सरकारने यावर्षीच मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकात शुल्क वाढ न करणे व शाळा सुरु नसल्यास इतर खर्च न घेणे या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला असूनही बहुतांश सर्व शाळांनी व शैक्षणिक संस्थांनी हे नियमच पायदळी तुडवत सक्तीची शुल्क वसुली आणि मागील वर्षीपेक्षा ज्यादा शुल्क वाढ केलेली आहे. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची कडक अंमलबाजवणी करावी व यात लक्ष घालावे, अशी मागणी चोंधे यांनी केली आहे.

समोर एवढी भयावह परिस्थिती असतांनासुध्दा जर शैक्षणिक संस्था जास्तीची व विनाकारण शुल्क वसुली करत असतील तर आम्ही याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगतात. ज्या पालकांनी विद्यार्थ्यांचे शालेय शूल्क जमा केले नाहीत, अशा पाल्यांच्या मुलांसाठी शाळा व्यवस्थापनाने ऑनलाईन वर्ग सुरू केल्याची लिंक पाठविलेली नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शख्यता निर्माण झाली आहे. यामुळे पालक वर्गात मुलांच्या भविष्याची चिंता वाढली आहे. शाळांच्या मनमानी कारभारविरुद्ध असंतोष निर्माण झाला, असेही चोंधे यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत यावर कारवाई होऊन शुल्कवाढ व ईतर शुल्क कमी होत नाहीत, तोपर्यंत हा मुद्दा आम्ही उचलून धरणार. वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतणार पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असा इशारा संकेत चोंधे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button