breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांना गरज असताना आमदार हॉटेलमध्ये- रावसाहेब दानवे

मुंबई | अजित दादांनी पत्र दिले तेव्हा त्यांच्याकडे गटनेतेपद होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे गटनेतेपद रद्द केले. पण अजूनही अजित पवारच गटनेतेपदी आहेत. त्यामुळे अजित पवारांचा व्हीप राष्ट्रवादीचे आमदार नाकारू शकत नाही असे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. राज्यपालांनी घटनात्मक तरतूदींचे पालन न केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण कोर्टाने त्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याचेही त्यांनी म्हटले.

शिवसेना आमदारांना हॉटेलातून फिरवत आहेत. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट असताना भाजपाचे आमदार त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. पण काँग्रेस,शिवसेनेचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून बिनबुडाचे आरोप करत असल्याचे दानवे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button