breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच मंत्रालयातून परतले

मुंबई | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत शनिवारी (23 नोव्हेंबर 2019) भल्या सकाळी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या मनधरणीचे अतोनात प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी आजही तीन-चार तास चर्चा केली. या मनधरणीचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं राष्ट्रवादीतील 30 ते 35 अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचं छगन भुजबळांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मोठं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button