breaking-newsमहाराष्ट्र

“शेकापमध्येही घराणेशाही, रुपनर बळीचा बकरा”

सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकाप तर्फे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी अर्ज दाखल केला. याआधी जाहीर झालेले भाऊसाहेब रुपनर यांनी अर्ज दाखल केला नाही. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकाप मधील उमेदवारीचा वाद आणि गणपतराव यांचा वारसदार कोण ? यावर आता पडदा पडला आहे. गणपतराव यांचे नातू डॉ अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली. आणि डॉ देशमुख यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला.

डॉ देशमुख यांचे नाव येण्याआधी भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित झाले होते. त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे उमेदवारी मध्ये बदल करीत नातवाला पुढे आणले. त्यामुळे मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरु झाली. या बाबत शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी शेकापवर सडकून टीका केली.

शेकाप मध्ये देखील घराणेशाही सुरु झाली आहे. गणपतराव यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज असताना उत्तराधिकारी म्हणून नातवाला निवडले, अशी टीका सेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी केली. गणपतराव आणि शेकाप कडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जर रुपनर यांना विरोध होता. तर दुसरा कोणी तरी कार्यकर्ता निवडायचा? रुपनर यांचा बळीचा बकरा केल्याची टीका यावेळी शहाजीबापू पाटील यांनी केली.यंदाच्या निवडणुकीत बदल होऊन युतीचा भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button