breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोशी परिसरात मोबाईल टॉवर उभारण्याचा मार्ग मोकळा

  •  नगरसेविका नम्रता लोंढे यांचा यशस्वी पाठपुरावा
  •  महापालिका प्रशासनाकडून काम सुरू करण्याचे आदेश

पिंपरी । प्रतिनिधी

इंद्रायणीनगरमधील सेक्टर ४, ६, ९ आणि ११ तसेच मोशी प्राधिकरण परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या आता लवकरच निकालात निघणार आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी दिली आहे.

इंद्रायणीनगर आणि मोशी परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर परिसरातील बिझनेस सेंटर इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यात यावा. त्याद्वारे सेक्टर क्रमांक ४, ६, ९ आणि ११ मधील नेटवर्क समस्या दूर करावी, अशी मागणी नेट टेल सोल्युशन प्रा. लि.च्या मुख्य व्यवस्थापकांना केली होती.

दरम्यान, नेटटेल सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून महापालिका बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. महापालिकेच्या अटीशर्तींनुसार मोबाईल टॉवरच्या बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. मोबाईल टॉवरबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाल्यास, ती आपणांस कळवलेपासून १५ दिवसांचे आत त्याचे निराकरण करणे व त्याबाबत पुर्तता अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना नगरसेविका नम्रता लोंढे म्हणाल्या की, परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे अडचणी येत होत्या. विद्यार्थी आणि गृहिणींनीही याबाबत अनेकदा माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. एखादी व्यक्ती आजारी असल्यास, आगीची घटना घडल्यास किंवा चोरीचा प्रकार झल्यास तात्काळ मदत मिळण्यात मोबाईल नेटवर्कमुळे समस्या येत होती. मोबाईल टॉवरझाल्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगली सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button