breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

शेअरिंगसाठी आता लवकरच गुगल आणणार ‘हे’ नवं फिचर…

आपल्यापैकी अनेकजण ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी येण्यापूर्वी स्मार्टफोन्समध्ये मोठ्या साइजच्या फाइल्स शेअर करण्यासाठी Shareit किंवा Xender या अ‍ॅप्सचा वापर करत होते. पण नुकतीच भारत सरकारने या चिनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी त्यामुळे युजर्स सध्या दुसऱ्या अ‍ॅपच्या शोधात आहेत. आता गुगलकडून अशा युजर्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या एक नवीन फिचरची टेस्टिंग गुगल घेत असून याद्वारे मोठ्या साइजच्या फाइल्स काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणे शक्य होणार आहे.

Nearby Share हे फीचर लवकरच गुगल आणणार आहे. अ‍ॅपलच्या AirDrop फीचरप्रमाणे हे फीचर काम करते. अँड्राइड युजर्स याद्वारे एका डिव्हाइसमधून अन्य डिव्हाइसमध्ये फाइल्स पाठवू शकतील. या डिव्हाइसच्या बीटा टेस्टिंगला कंपनीकडून सुरूवात झाली असून हे फीचर काही बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे नवीन फीचर Android 6 आणि त्यानंतरच्या पुढील सर्व अँड्रॉइड डिव्हाइसला सपोर्ट करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button