ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचा आरोप; अजयकुमार गुजर आणि प्रफुल गावंडे पोलिसांच्या ताब्यात

 अकोला |अकोल्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, तसेच औरंगाबादचा अजयकुमार गुजर  आणि प्रफुल्ल गावंडे  यांच्यावर अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. इतकेच नाही तर त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. आज या प्रकरणातील आरोपी औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे यांना अकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मालोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नेमकं काय होतं प्रकरण?

संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबीत व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले. त्यातून सुटका व्हावी व आपल्यावरील उपरोक कार्यवाही रद्द व्हावी या करीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या अडचणींचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहादरसिंग गुजर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करून प्रशासनाद्वारे होत असलेली उपरोक्त कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोटया भुलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये जमा केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. यामध्ये राज्यभरातील जवळपास ७० हजार एस टी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली रक्कम ३ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याप्रमाणे अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढ़े (रा. कृष्णकलनी अकोला रोड, अकोट) आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचान्यांद्वारे संकलीत केलेले ७४ हजार ४०० रुपये १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अकोट डेपो येथे नेमणूकीवर असलेले प्रफुल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रफुल गावंडेंची आत्मसमर्पण’पूर्वी पत्रकार परिषद

फसवणूक प्रकरणातील आरोपी प्रफुल गावंडे यांनी आज आत्मसमर्पण करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि अजय गुजर यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले, तसेच सदावर्ते यांनी गुजरांमार्फत पैशांची मागणी केली असाही आरोप प्रफुल गावंडे यांनी केला. सध्या प्रफुल गावंडे हे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. तर दुसरा आरोपी असलेला अजयकुमार गुजर यालाही अकोट शहर पोलिसांनी औरंगाबाद येथून आज सकाळी ताब्यात घेतले असून रात्री १० वाजता त्याला अकोल्यातील अकोट शहर पोलीस ठाण्यात पोहचवण्यात येणार आहे.

अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना चौकशी आणले जाणार अकोल्यात…

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या शनिवारी अजयकुमार गुजर आणि प्रफुल गावंडे यां दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याचे समजते. तर येत्या काही दिवसांत अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनाही अकोट शहर पोलिस चौकशीसाठी अकोल्यात आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button