breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिष्यवृत्तीपोटी 95 लाख विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा

  • समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांची माहिती

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या 805 आणि आठवी ते दहावीच्या 1 हजार 852 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपोटी एकूण 95 लाख 2 हजार रुपये पालिकेने अदा केले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

महापालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविले होते. प्रपत्र अ मधील इयत्ता पाचवी ते सातवीमधील 805 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांना प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे 32 लाख 20 हजार रुपये शिष्यवृत्तीपोटी देण्यात आले. प्रवत्र ब मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या एकूण 1047 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांना सहा हजार रुपये प्रमाणे 62 लाख 82 हजार रुपये वाटप करण्यात आले. शिष्यवृत्तीपोटी पालिकेने एकूण 95 लाख 2 हजार रुपयांचा निधी खर्ची घातला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. ही रक्कम डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकारी ऐवले यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button