breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते विलास लांडे यांना मातृशोक

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्री इंदूबाई विठोबा लांडे यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या.

भोसरी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता भोसरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराला कोणाही नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे.

इंदूबाई लांडे यांच्या पश्चात पती विठोबा लांडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहीनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. तीन दशकांहून अधिक काळ शहराच्या राजकारणावर अधिराज्य गाजविणारे माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय जडणघडणीत इंदुबाई लांडे यांचा मोठा वाटा राहिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button