breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महापालिका करणार शिवरायांच्या विचारांचा प्रसार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समुह उद्यान येथे करण्यात यावे, अशा सुचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य विकास डोळस, संदीप वाघेरे, आयुक्त श्रावण हर्डीकर व मराठा क्रांती मोर्चाचे जीवन बोराडे, धनाजी येळकर, सतिश काळे, वैभव जाधव, नानासाहेब फुगे, विशाल यादव आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवराय प्रबोधन पर्व निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम-पोवाडा स्पर्धा, प्रबोधनात्मक व्याख्याने, किर्तन आदी कार्यक्रम भक्ती-शक्ती शिल्प समुह उद्यान याठिकाणी १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे विविध कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवराय प्रबोधन पर्व निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सुचनाही महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button