breaking-newsपिंपरी / चिंचवड

सावित्रीबाई फुले शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा मोशी या शाळेचे स्नेहसंमेलन आज रोजी उत्साहात पार पडले. त्यामध्ये विद्यार्थी , शिक्षक यांनी भाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सदर कार्यक्रमासाठी माजी महापौर नितीन काळजे,माजी क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसदस्या विनया तापकीर, माजी ग्रामपंचायत सदस्य हरीभाऊ सस्ते, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मुंडे, सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

सदर शाळेचे विद्यार्थी दरवर्षी स्कॉलरशिप गणवत्ता यादीत निवडले जातात. या शाळेस आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे. शाळेची पटसंख्या संपूर्ण महापालिकेत सर्वाधिक आहे. शाळेमध्ये दरवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता सस्ते यांनी केले. आभार संतोष शितोळे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button