breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसैनिकांनी अखेर बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला

बेळगाव – शिवसैनिकांनी अखेर बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला आहे, गनिमी कावा करत बेळगाव जिल्ह्यातील कोनेवाडी गावात शिवसैनिकांनी भगवा फडकवला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा गनिमिकावा यशस्वी झाला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत शिवसैनिक बेळगावकडे निघाले होते. मात्र, त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. सोबतच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेतच रोखल्याचा दावा आंदोलनकांनी केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडला. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज अनधिकृतरीत्या लावला होता. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. तरीही ठरल्याप्रमाणे शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्यासाठी निघाले. कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवणारच असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button