breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : स्वीडनचा दक्षिण कोरियावर निसटता विजय

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा : अँड्रियास ग्रॅनक्‍विस्टचा निर्णायक गोल 
निझनी – दक्षिण कोरियाची कडवी झुंज निसटत्या विजयाने मोडून काढताना स्वीडन संघाने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या एफ गटात आगेकूच केली. आता एफ गटात स्वीडन 3 गुणांसह पहिल्या स्थानावर असून गतविजेत्या बलाढ्य जर्मनीला चकित करणारा मेक्‍सिको संघ 3 गुणांची कमाई करून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरियाच्या चिवट बचावामुळे मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या सामन्यात स्वीडनसाठी अँड्रियन ग्रॅनक्‍विस्टने 65व्या मिनिटाला लगावलेला गोल निर्णायक ठरला. तब्बल 42 हजार 300 प्रेक्षकांनी हजेरी लावलेल्या या सामन्यात पहिल्यापासून स्वीडनचे कल्पक आक्रमण विरुद्ध कोरियाचा अप्रतिम बचाव असे चित्र पाहावयास मिळाले. कोरियाच्या शिन वूक किमला 12व्या मिनिटाला नियमभंगाबद्दल यलो कार्ड दाखविण्यात आले. परंतु त्यानंतर पूर्वार्ध संपेपर्यंत कोरियाने एकही फाऊल न करता किल्ला लढविला.

विश्‍वक्रमवारीत 24व्या क्रमांकावर असलेला स्वीडन संघ 57व्या स्थानावरील कोरियावर विजय मिळवेल अशीच अपेक्षा होती. परंतु कोरियन खेळाडूंनी त्यासाठी स्वीडनला प्रत्येक क्षणी कडवी झुंज द्यायला लावली. परंतु आक्रमणात कोरियन खेळाडू कमी पडले व त्याचाच परिणाम त्यांना पराभव होण्यात भोगावा लागला. मध्यंतरानंतर स्वीडनच्या खेळाडूंनी कोरियन गोलक्षेत्रावर एकापाठोपाठ एक चढाया केल्या. परंतु कोरियन बचावफळी त्यांना यश मिळू देत नव्हती.
अखेर 65व्या मिनिटाला गोलक्षेत्रापासून नजीकच्या अंतरावरून अचूक फटका लगावताना अँड्रियास ग्रॅनक्‍विस्टने स्वीडनचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या कोरियाने धोक्‍याची जाणीव होताच प्रतिहल्ले सुरू केले. परंतु स्वीडनच्या मध्य आणि बचावफळीने अतिशय दक्षतेने कोरियाचे हल्ले निष्प्रभ ठरविले.
सामन्याची आकडेवारी 
स्वीडन प्रकार दक्षिण कोरिया
15 – एकूण फटके – 5
6 – गोलक्षेत्रात फटके – 3
4 – गोलच्या दिशेने फटके – 0
6 – रोखलेले फटके – 3
445 एकूण पासेस 359
360 – अचूक पासेस – 231
6 – कॉर्नर किक्‍स – 5
1 – यलो कार्ड – 2
20 – फाऊल – 23
1 – गोल – 0

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button