breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान, भाजप सरकार स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याने अखेर विरोधात बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावर अखेर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाच रणांगणात यावे लागले आहे. राजभवनाच्या आवारात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका स्पष्ट केली.

भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा तासाभराने दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातील नेत्यांसह भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव हेदेखील उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. भाजपाची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर पुन्हा तासाभराने दुसरी बैठक घेण्यात आली. ही बैठक नुकतीच संपली असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. राजभवनाच्या आवारात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका स्पष्ट केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button