breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना युवा नेते परशुराम आल्हाट यांच्यातर्फे स्वखर्चातून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अभियान!

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडमधून पहिला प्रतिसाद

– मोशीतील आल्हाट दांम्पत्याकडून कोरोनाच्या संकटात नागरिकांसाठी सकारात्मक पुढाकार

पिंपरी । प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहीम हाती घेतली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वप्रथम स्वखर्चातून ही मोहीम राबवण्याचा निर्णय शिवसेना  युवा नेते परशुराम आल्हाट यांनी घेतला. त्याची सुरूवात बुधवारी करण्यात आली.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख, व कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, शिवसेना महिला संघटिका भोसरी विधानसभा प्रमुख सौ. रूपाली आल्हाट, समनव्यक भोसरी विधानसभा परशुराम आल्हाट, शिवसेना विभागप्रमुख योगेश बोराटे, युवानेते तुषार आल्हाट, ऍड संकेत चावरे, अमित आल्हाट, विनायक आल्हाट, मनोज आल्हाट, अमोल आल्हाट, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मोशी आणि परिसरातील नागरिकांसाठी गेल्या पाच महिन्यांपासून  शिवसेना युवा नेते परशुराम आल्हाट आणि त्यांच्या सौभाग्यवती रुपाली आल्हाट यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. जगभरामध्ये कोरोना आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रालाही या आजाराने विळखा घातला आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही हे अभियान मोशी परिसरात हाती घेतले, अशी माहिती परशुराम आल्हाट यांनी दिली.

यावेळी रुपाली आल्हाट म्हणाल्या की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहीम कोविड-19 साथ नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या परिसरात मोहीमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल. यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या तपासणी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन सौ. आल्हाट यांनी केले.

… अशी असे मोहीम!

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहीमेअंतर्गत महानगरपालिकेचे आरोग्य पथक घरोघरी भेटी देणार आहे. घरातील सदस्यांचे एसपीओ-2 तपासणी, कोमॉर्बिड स्थितीची माहिती घेण्यात येणार आहे. कोविडसदृश्य लक्षण असतील त्यांना उपचारासाठी नजीकच्या फिव्हर किल्निकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. कोमॉर्बिड स्थिती असणाऱ्या रुग्णांना नियमित उपचार घेण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित रुग्ण उपचार घेतात की नाही याची खात्री केली जाणार आहे. घरातील सदस्यांना आवश्यक माहिती व आरोग्य संदेश देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button