breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद; दिल्ली पोलिसांचा दावा

Satish Kaushik : बॉलीवूडमधील अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही कार्डियाक अरेस्टमुळे कौशिक यांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आले आहे.

सतीश कौशिक दिल्लीतील बिजवासन येथील फॉर्महाऊसवर होळी खेळले. त्यानंतर रात्री १२ वाजता त्यांना अस्वस्त वाटू लागले. त्यांना श्र्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावलं आणि त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना तात्काळ फोर्टीस रूग्णालयात नेण्यात आले. पण तिथे जाण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.

सतिश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की आणखी काही कारणामुळे याचा दिल्ली पोलीस शोध घेत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिक सहभागी झाले होते. पोलिसांनी फार्म हाऊसचा कसून तपास केला असता. त्यांना काही औषधे सापडली आहेत. यात डायजीन आणि शुगरची नियमित औषधेही आहेत. त्याशिवाय इतरही काही औषधे सापडली आहेत. ही औषधे कोणती आहेत? ती आजारांवरचीच आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button