breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शिवसेना-भाजप युती तुटणार?, सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीशी होणार घरोबा

मुंबई – भाजपा सत्ता स्थापनेत अपयशी ठरल्यास शिवसेना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीसमोर प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे आता नवं समीकरण जुळताना दिसणार आहे. शिवसेना-भाजपमधील दरी वाढल्यामुळे युती तुटण्याच्या मार्गावर आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष शिघेला पोहोचला आहे. पण आता शिवसेनेने नवा पर्याय शोधल्याचं दिसतं आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे फलक आता मुंबईत झळकले आहेत. कलानगर, बांद्रा या भागात हे फलक लागले आहेत. बदललेल्या समीकरणामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली घडत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button