breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोक्कातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या, अन्य गुन्ह्यांची उकल

पिंपरी – मोक्कातील एका फरार आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे, सहकारनगर आणि हिंजवडी ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे नोंद आहेत.  

लक्कडसिंग शितलसिंग दुधानी (वय 29, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी आरोपीने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून मुंबई बेंगलोर हायवे रोडवर लिफ्टच्या बहाण्याने कारला थांबवून चालकाला चाकूचा धाक दाखवून कार चोरली. त्या कारचा उपयोग करून त्याने पिंपरी चिंचवड परिसरात घरफोड्या केल्या होत्या. आरोपीकडून 2 लाख 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button