breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागताला नोटांची उधळण

सोलापूर |महाईन्यूज|

सोलापूर शिवसेनेमधील गटबाजी चर्चेत असताना आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नोटांची उधळण करण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शिवसेना विरोधकांच्या रडारवर आली आहे.

मंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेचे उपनेते व सोलापूर संपर्कप्रमुख तानाजी सावंत नाराज होते. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपसोबत जात शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याचे समोर आले. त्यामुळे तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. सोलापूरचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना पदावरून दूर करत पुरुषोत्तम बरडे यांची नेमणूक प्रभारी जिल्हाप्रमुखपदावर करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button