breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वाडियात रुग्णालयातील अधिकाऱ्यांची दुतर्फा कमाई

मुंबई | महाईन्यूज

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मिळणारे अनुदान थकित असल्याचे कारण देऊन वाडिया रुग्णालय बंद करण्याच्या हालचाली सुरू असतानाच या रुग्णालयातील काही उच्चपदस्थ चक्क महिन्याला दुतर्फा कमाई करत असल्याचे उघड झालेले आहे. या रुग्णालयांतर्गत असलेल्या बाल रुग्णालय आणि प्रसूती गृह अशा दोन्ही विभागांतून या उच्चपदस्थांना वेतन मिळत असल्याचा आरोप महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी केला आहे. एवढेच नव्हे तर, या रुग्णालयातून निवृत्त झालेल्या दहा कर्मचाऱ्यांनीही दोन्ही विभागांच्या सेवानिवृत्तीचे लाभ मिळवल्याचे ते म्हणाले आहेत.

अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसूती आणि लहान मुलांमधील गंभीर आजार यावर उपचार करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय बंद होणार असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडालेली आहे. पालिकेने अनुदान थकवल्यामुळे हे रुग्णालय सुरू ठेवणे शक्य नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेवर मोठय़ा प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या गटनेत्यांची बैठक सोमवारी महापौर दालनात पार पडली होती. या बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन वाडिया रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप केला. वाडिया रुग्णालयाअंतर्गत बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि नौरोजी वाडिया प्रसूती गृह अशी दोन रुग्णालये आहेत. एकाच रुग्णालयाचे हे दोन विभाग असताना येथे कार्यरत असलेले सहा उच्चपदस्थ अधिकारी दोन्ही विभागांकडून वेतन मिळवत असल्याचे ते म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button