breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोना, अतिदक्षता विभागात उपचार

मुंबई | शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ते दाखल झाले आहेत. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना संकटात अनेक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र, आता लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नांदेडमध्ये जवळपास सहा नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

1) अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस) – कोरोनामुक्त
2) मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त
3) अमरनाथ राजूरकर (आमदार – विधानपरिषद, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त
4) माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु
5) प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) – उपचार सुरु
6) प्रताप पाटील चिखलीकर (खासदार- नांदेड, भाजप) – उपचार सुरु

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button