breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम विजयी

अहमदनगर – अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे.  या निवडणुकीत सर्वात आश्चर्यकारक निकाल म्हणजे वादग्रस्त उमेदवार श्रीपाद छिंदमचा लागलाय.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यामुळे सध्या तडीपारीची कारवाई भोगत असलेला श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आलाय. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदिप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. आपला विजय निश्चित असल्याचा दावा श्रीपाद छिंदमने मतदान केल्यानंतर केला होता.

कुणाला संपवायचं ते मतदारांच्या हातात असतं, मतदार हा राजा असून माझा विजय निश्चित आहे, असं श्रीपाद छिंदमने काल म्हटलं होतं. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असली तरी त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button