breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘एमपीसीबी’ कडून केजूबाई बंधा-यातील पाण्याचे घेतले नमुने

– एमपीसीबी आणि महापालिका पर्यावरण कर्मचा-याकडून पाहणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवडच्या पवना नदीवरील केजुबाई बंधारा परिसरात ‘एसपीसीबी’ आणि पर्यावरण विभागातील अधिका-यांकडून मृत माशांची पाहणी करण्यात आली. त्यांनी पाण्याचे नमुने घेवून त्या माशांचे शवविच्छेदनाच्या अहवाल तयार करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने पवना नदीवरील केजुबाई बंधारा परिसराची बुधवारी (दि.6) पाहणी करण्यात आली. पवना नदी पात्रात मृत माशांचे नेमकं कारण शोधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनपा पर्यावरण विभागाचे एच.ए. मुल्ला, एमपीसीबीचे हसबनिस, उत्कर्ष शिंगारे, आबा मसूडगे, सचिन काळभोर हे सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनी पाण्याचे नमुने, माशांचे शवविच्छेदन करण्यासाठी मासेही घेतले. या वेगवेगळ्या प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होणार असून तातडीने संबंधितांवर कडक कारवाई करू, असे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हसबनिस यांनी सांगितले. याशिवाय नदीपात्रात बोटीद्वारे जाऊन प्रत्येक नाल्याचे पाण्याचे नमुने घेण्यात आले, माशांचा शवविच्छेदन अहवाल व पाणी अहवाल दोन्ही तातडीने देण्यात येणार आहे.

आठ नाल्यांतून रसायन मिश्रीत पाण्याचे नदी पात्रात
पिंपरी-चिंचवडच्या पवना नदीवर असलेल्या केजुबाई धरण भागात शेकडो मासे मृतावस्थेत आढळले आहेत.अडीच किलोमीटरच्या परिसरात सुमारे ८ नाले असून एका नाल्यातून रसायन मिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे मासे मरत असल्याचं सांगण्यात येत आहे. आता महापालिका यावर काय उपाय करणार ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button