breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवजयंतीनिमित्त भोसरीत रक्‍तदान शिबीर, पुष्पार्पण सोहळा

पिंपरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनिमित्त भोसरीमध्ये रक्‍तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी आणि पुष्पअर्पण सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष योगेश गवळी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणार आहे. भोसरी येथील पीएमटी चौकात, दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 10 वाजता शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पार्पण सोहळा होईल. तसेच, मोफत नेत्रतपासणी शिबिरामध्ये मधुमेह नेत्रतपासणी, मोतीबिंदू, कॉम्पुटरद्वारे डोळ्यांची तपासणी, काचबिंदू तपासणी करण्यात येईल. आरोग्य शिबिरांतर्गत जनरल चेकअप, रक्‍तातील साखर, महिलांसाठी मॅमोग्राफी व सर्व्हिकल कॅन्सर स्क्रिनिंग, ब्लडप्रेशर आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. यासाठी एसियन आय हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल व्यवस्थापनाने सहकार्य केले आहे, अशी माहिती योगेश गवळी यांनी दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button