breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रभाग भाजप सहकार आघाडीच्या कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्‌घाटन

– दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी नागरिकांना मिळणार मोफत सल्ला

पुणे | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, सहकार आघाडी पुणे शहराच्या वतीने “मोफत कायदेशीर सल्ला केंद्र“ चे उदघाटन नुकतेच करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. भाजपा शहर कार्यालय, पुणे येथे हा कार्यक्रम पार पड़ला.

सर्वसामान्य पुणेकरांसाठी दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. मान्यवर अभ्यासू कायदेतदन्य मार्गदर्शन करणार आहेत. गृहरचना सोसायट्या , नागरी पतसंस्था , सहकारी बॅका यासोबत कौटुंबिक आणि इतर योग्य विषयावर मोफत सल्ला दिला जाणार आहे. पुणेकरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदिश मुळीक यांनी केले आहे .

दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय जनता पार्टी , पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालणार आहे . यासाठी सहकार आघाडी पुणे शहर यांनी तयार केलेल्या https://surveyheart.com/form/6016afdc95ad364d0c2e51d0
या लिंकवर संस्थेची अथवा वैयक्तिक माहिती, अडचणी यांची माहिती पाठवायची आहे. ती लिंक सोशल मिडीयाच्या विविध माध्यमातुन पुणेकरांपर्यत पोहचविणार असल्याचे अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले.

या प्रसंगी भाजपा पुणे शहर संघटन मंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह नगरसेवक , शहर पदाधिकारी , सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि विविध आघाडयांचे अध्यक्ष उपस्थित होते .

कार्यक्रमाचे संयोजन भाजपा सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button