breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, विविध पथके तैनात

निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दैनंदिन कामकाज थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातून चालणार आहे. तर, अर्जाचे वाटप, अर्ज स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप, मतपत्रिका छपाई आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावरुन होणार आहे, अशी माहिती  चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार यांनी दिली. तसेच भरारी, व्हिडीओ सर्व्हिलन्स, स्टॅटेस्टिक पथके तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी (दि.27) प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीची माहिती मनिषा कुंभार यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.

कुंभार म्हणाल्या, शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. पाच लाख 16 हजार 836 एकूण मतदार आहेत. त्यामध्ये दोन लाख 45 हजार 486 पुरुष तर दोन लाख 41 हजार 318 महिला आणि 32 इतर मतदार आहेत. लोकसभेनंतर तीन महिन्यात 14 हजार 96 नव मतदारांची वाढ झाली आहे. पुरवणी मतदारयादी 4 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदारसंघात 439 मतदान केंद्र असणार आहेत. सहाय्यकारी मतदान केंद्रे 52 आहेत.  59 खासगी इमारती आणि 31 सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 29 आणि दुस-या मजल्यावर 15 मतदान केंद्रे असणार आहेत. त्याठिकाणी लिफ्टीची सोय करण्यात आलेली आहे. 651 दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्रे असणार आहेत. मोकळ्या मैदानावर, पार्किंगमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

54 झोनल अधिकारी आणि 250 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना व्होटर स्लिप वाटपण करणे, मतदान केंद्राची सद्यस्थिती, आकडेवारीची माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. खर्च, तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. प्रचाराच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना असणार आहे.

भरारी, व्हिडीओ सर्व्हिलन्स, स्टॅटेस्टिक पथके तैनात असणार आहेत. चार निरीक्षक असणार आहेत. चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठी एकच निरीक्षक असतील. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (दि.28) कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही, कुंभार यांनी सांगितले.  तसेच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनीधींसोबत आज सायंकाळी बैठक होणार आहे.

‘असा’ आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना – 27 सप्टेंबर 2019उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस – 4 ऑक्टोबर 2019उमेदवारी अर्जांची छाननी – 5 ऑक्टोबरउमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – 7 ऑक्टोबरमतदान – 21 ऑक्टोबरमतमोजणी – 24 ऑक्टोबरनिवडणूक प्रक्रिया पुर्ण करणे – 27 ऑक्टोबर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button