breaking-newsआंतरराष्टीय

शिक्षण तर पूर्ण झालं नाही म्हणत.. स्मृती इराणींनी शेअर केला बिल गेट्स यांच्यासोबतचा फोटो

शिक्षण तर पूर्ण झालं नाही… आता पुढे काय करु? अशी मजेशीर पोस्ट लिहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. इंडियन न्यूट्रिशन अॅग्रीकल्चरल फंडची सुरुवात स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांच्या हस्ते करण्यात आली. सर्व प्रकारचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कुपोषणावर नियंत्रण ठेवणे हे या मागचे उद्दीष्ट आहे.हा कार्यक्रम झाल्यानतर स्मृती इराणी यांनी बिल गेट्स यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोसंदर्भात त्यांनी लिहिलेल्या ओळी या मात्र लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. सोच रहे हैं पढाई पूरी करी नहीं, आगे क्या करें! अनेक नेटकऱ्यांनी या फोटोबाबत स्मृती इराणी यांचं कौतुकही केलं आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. क्यूँ की साँस भी कभी बहू थी! या मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी ही भूमिका केली होती. ही भूमिका लोकांच्या लक्षातही राहिली होती. त्याचाच संदर्भ देत अनेकांनी तुलसी तुम्ही रॉकस्टार आहात अशाही कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी तुलसी तुम्ही परत या अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत.स्मृती इराणी आणि बिल गेट्स या दोघांनीही शिक्षण पूर्ण केलेलं नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार स्मृती इराणी यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं नाही. तर बिल गेट्स यांनीही शिक्षण अर्ध्यावर सोडलं आहे. हार्वर्ड विद्यापीठात दोन वर्षे शिक्षण घेतल्यावर त्यांनी मायक्रोसॉफ्टवर लक्ष केंद्रीत केलं. त्यासाठी त्यांनी कॉलेज सोडलं. आता ते जगातले सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button