breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘विराट कोहली चॅम्पियन खेळाडू आहे, तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल’; रिकी पाँटिंग

INDvs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तीन सामने खेळले गेले आहेत. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी अनेक दिग्गजांनी भाकित केलं होतं की, या मालिकेत विराट कसोटी शतकांचा दुष्काळ संपवेल. मात्र विराटला ५० धावांचा टप्पा एकदाही ओलांडता आलेला नाही. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने भाष्य केलं आहे.

मी या मालिकेतील कोणाच्याही फॉर्मबद्दल विचार करत नाही कारण ही मालिका एक फलंदाज म्हणून दु: स्वप्न ठरली आहे. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना जिंकून शानदार पुनरागमन केलं, असं रिकी पॉन्टिंग म्हणाला.

विराट कोहली चॅम्पियन खेळाडू आहे, तो लवकर फॉर्ममध्ये परतेल. या प्रकारच्या खेळेडूला खराब फॉर्ममधून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे. त्याने लवकरच फॉर्ममध्ये परतावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मला खात्री आहे की तो लवकरच मजबूत पुनरागमन करेल, असं रिकी पॉन्टिंग म्हणाला. 

दरम्यान, उद्यापासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button