breaking-newsपुणे

शासनाचा ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार किसन म़हाराज साखरे यांना जाहीर

पुणे –  राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ. किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया काव्हार्लो, भास्करराव आव्हाड आणि सय्यदभाई आदी सदस्यांच्या समितीने काम पाहिले.

दरम्यान,  संत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे. विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. साखरे यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button