breaking-newsपुणे

‘शाळेचे रिपोर्ट कार्ड तुमचे भविष्य ठरवू शकत नाही – अतुलचंद्र कुलकर्णी’

महाईन्यूज | पुणे | ऑर्बिस शाळेच्या दहाव्या वर्धापनदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून, तरुण वैज्ञानिक आणि उद्योजकांना त्यांचे कौशल्य आत्मविश्वासाने प्रदर्शित आणि प्रोत्साहित करण्यासाठी ऑर्बिफेयरचे आयोजन केले होते. या उत्सवाचा भाग म्हणून ऑरिगामी पेपर क्रेन, बुन्टिंग पेंटिंग, ऑर्बिस रन आणि ऑर्बिफेयरचा समावेश होता. या उत्सवामध्ये शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शाळेचे कर्मचारी या सर्वांनी भाग घेतला होता.

यावेळी बोलताना डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले की, शाळेचे रिपोर्ट कार्ड तुम्ही भविष्यात यशस्वी होऊ शकता का नाही हे निश्चित करू शकत नाही. आपल्या कौशल्यावर कधीही शंका घेऊ नका तसेच बोर्डाचा निकाल काय येईल याचा विचार करू नका नेहमी आपल्या आयुष्यात चमकत रहा.

यावेळी आय.एस ऑफीसर, डेप्युटी सेक्रेटरी, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट श्री.सुशील खोडवेकर म्हणाले की, आपल्या उद्देशाबद्दल, स्वप्नांबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल जागरूक रहा आणि आपले कार्य करा.

वर्धापनदिना निमित्त विद्यार्थ्यांनी ‘वर्ल्ड टू चेंज’ हे नाटक सादर केले. हे नाटक सादर करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर येणाऱ्या दबावांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी आणि कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सक्षम कसे असावेत याबद्दल अमूर्त कल्पना दर्शविण्यासाठी गाणे आणि नृत्याचा वापर केला.

भारतीय पोस्टल सर्व्हिसेसने शाळेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त टपाल तिकिट देखील सुरु केले आहे. या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांचे अनुभव आणि ऑर्बिसच्या संचालकांचा दृष्टीकोन दाखविणारा चित्रपट देखील सादर करण्यात आला. तरुण आणि प्रतिभावान ऑर्बियन्सच्या अनेक मोहक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. ऑर्बिफेयरने या उत्सवाची सांगता झाली. ज्यामध्ये विज्ञाना वरील विविध कार्यक्रम, खाद्य स्टॉल्स आणि खेळांचा समावेश करण्यात आला होता.

या प्रसंगी वातावरण खूपच छान होते. झुम्बा सत्र आणि फ्लॅश मॉब सारख्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी वातावरण अधिक सजीव आणि उत्साही बनवले. विद्यार्थांना चित्रविचित्र प्रॉप्स असलेले एक फोटो बूथ फोटो काढण्यासाठी सजवण्यात आले होते ज्याचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांनी खूप मेहनत घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button