breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

युवासेनेने केली बीट मार्शलची गस्त वाढविण्याची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

बीट मार्शलची गस्त वाढवून दापोडी व फुगेवाडी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात यावी. त्यासाठी बीट मार्शलच्या वाहनांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभा व आशीर्वाद महिला बचत गटाने केली आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक नीलेश हाके, आशीर्वाद महिला बचत गटाच्या अध्यक्ष शीला जाधव. तात्या तापकीर, सुवर्णा कुटे, रुत जेकब, रेखा थोरात, रेश्मा चार्य, जुबेदा शेख उपस्थित होते.

दापोडी परिसरात घरफोडी, छेडाछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यासाठी नागरिकांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button