breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळांमध्ये समस्या आहेत म्हणून जबाबदारी टाळू नका – महापौरांचे मुख्याध्यापकांना आवाहन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिका शाळांमध्ये निश्चित समस्या, अडीअडचणी आहेत, त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार सर्व शाळा आयएसओ व स्मार्ट करण्यात येतील, परंतू, प्रत्येकांनी आपआपली जबाबदारी पार पाडून आपल्या अनुभवाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवावे, असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले.

चिंचवड येथील आटो क्लस्टर सभागृहात आज (शनिवारी) महानगरपालिका शाळांमधील मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. या सभेत महापौर राहूल जाधव बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांना महापौर जाधव यांनी भेट देवून सर्व समस्या जाणून घेतल्या. सर्व शहरातील शाळांचा दर्जा व गणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेस शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, नगरसदस्या संगिता भोंडवे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्र. शिक्षणाधिकारी पराग मुंढे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले की, शिक्षकांना आपल्या अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी करावा. आजचे विद्यार्थी हे शहरातील उद्याचे भविष्य आहे. शहरातील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्याचे स्वप्न आहे. ते आपल्या सहकार्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूढे शाळांना अचानक भेटी देवून सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेणार आहे. शाळांसाठी आवश्यक ती सर्व सुविधा पुरविण्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात येतील. परंतू शाळांचा दर्जा व गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे महापौर यांनी सांगितले. तसेच शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला रुबेला,गोवर लस देण्यासाठी प्रयत्न करणे व जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button