breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Chembur Baby Tested Corona Positive | चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 30 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 181 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे मात्र चेंबूरच्या एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमधील एका रुग्णालयात 3 दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.

चेंबूरमध्ये तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाची प्रकृती नाजूक आहे. ही बातमी कळल्यानंतर या बाळाच्या पित्याला अश्रू अनावर झाले. पत्नीच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी बनवला आहे. या व्हिडीओत त्यांना त्या रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष देण्याची विनंती केली आहे. दरम्यान या बाळावर आणि त्याच्या आईवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button