breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय साहित्य खरेदी फसल्यानंतर शिक्षण विभागाचा आता ‘वॉटर फिल्टर’ खरेदीचा घाट

  • टेंडर समितीच्या बैठकीत पटसंख्येनुसार खरेदीचा झाला निर्णय
  • टक्केवारी उकळण्यासाठी भाजप नगरसेविकेच्या पतीची मध्यस्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेले नसताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संबंधीत अधिका-यांना आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना विद्यार्थ्यांची खूपच काळजी वाटू लागली आहे. शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव फसल्यानंतर आता मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ”वॉटर फिल्टर” बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंंबंधीत टेंडर समितीची कालच बैठक झाली असून सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये हे फिल्टर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या एका नगरसेविकेचा पती हे काम करण्यासाठी अधिका-यांच्या मागे ‘हात धुवून’ लागला आहे. या कामासाठी त्याने मर्जीतील ठेकेदार देखील अधिका-यांच्या समोर उपस्थित केला आहे. अतिरिक्त आयुक्तांसह शिक्षण प्रशासन अधिका-यांचा याला प्रतिसाद मिळत आहे. केवळ टक्केवारी खाण्यासाठी मर्जीतील ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून शिक्षण विभागाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे शालेय शिक्षण खरेदीचा चार कोटींचा विषय मागे घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर पुन्हा शाळेत ”फिल्टर” बसविण्याचा विषय समोर आणला जात आहे. महिला व बालकल्याण समितीने वॉटर फिल्टर बसविण्याच्या विषयाला मंजुरी दिल्यानंतर तो विषय शिक्षण विभागाने प्रक्रियेत घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधींची होणार लूट

राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या 108 प्राथमिक शाळा आणि 18 माध्यमिक शाळेतील सुमारे 40 हजार विद्यार्थी घरात बसवूनच धडे गिरवत आहेत. जर शाळाच सुरू नसेल तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा अट्टाहास प्रशासनाने केल्यामुळे ते प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले. आता पुन्हा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय करण्यासाठी ”वॉटर फिल्टर” खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यासाठी नविदा राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, एकाच ठेकेदेराला डोळ्यासमोर ठेवून या कामाची निविदा राबविण्याचा विचार होत आहे. त्यासाठीच काल झालेल्या निविदा समितीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. एका नगरसेविकेच्या पतीसाठी ही निविदा राबविली जात असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button