breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आता पवनाथडी आयोजनासाठीही पालिकेला समन्वयक हवाय !

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. जत्रेच्या संपूर्ण आयोजनासाठी समन्वयक म्हणून त्रैयस्त संस्थेची नेमणूक करण्याची संकल्पना सदस्यांनी समोर आणली आहे. समन्वयक संस्थेच्या मध्यस्थितीने ब्रॅण्डेड कंपन्यांकडून पवनाथडी जत्रेसाठी स्पॉन्सर्शिप घेण्यात येणार आहे.

शहरातील बचत गटांच्या महिलांनी घरी तयार केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतुने पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरूवात केली. त्याला बचत गटांच्या महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊन महिलांच्या व्यावसायांना चालणा मिळते. आता या जत्रेकडे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून पाहिले जात आहे. पवनाथडी जत्रा भरविण्यासाठी समन्वयक संस्थेची गरज असून त्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

या कामासाठी मे. पॉईंट ऑफ व्ह्यु संस्थेची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. ही संस्था जत्रेचे नियोजन, थीम्स, डिझाईन्स आणि ले आऊट करणार आहे. जास्तीतजास्त ब्रॅण्डेड कंपन्यांशी समन्वय साधून त्यांची स्पॉन्सर्शिप मिळविण्यात येणार आहे. जत्रेसाठी त्यांच्याकडून ठरावीक देणगी घेतली जाईल. असे कामकाज या संस्थेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी संस्थेची समन्वयक म्हणून नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मान्यता घेण्यात येणार आहे. मात्र, आजची स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आल्याने या प्रस्तावाला आता पुढील स्थायी समितीच्या मंजुरीची आपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button