breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात 16 अनधिकृत मोबाईल टाॅवरला मिळकतकरातून मिळतेय सूट ; करसंकलन कार्यालयाचा भोंगळ कारभार

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत विविध कंपन्याचे 16 मोबाईल टाॅवर अनधिकृत असून त्या टाॅवरला महापालिकेकडून कोणतीही कर आकारणी करण्यात येत नाही. त्यामुळे महापालिका करसंकलन कार्यालयातील अधिका-यांचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. दरम्यान, महापाैर नितीन काळजे यांनी शहरातील मोबाईल टाॅवरची तत्काळ नोंदणी करुन संबंधिताकडून कर आकारणी करण्यात यावी, असे पत्र दिल्यानंतर महापालिका अधिका-यांना जाग आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध मोबाईल कंपन्यांचे टाॅवर कार्यान्वित आहेत. हे मोबाईल टाॅवर विविध घरांसह कमर्शियल इमारतींवर उभारण्यात आलेले आहे. परंतू, शहरातील किती मोबाईल टाॅवर अधिकृत असून त्यातील किती मोबाईल टाॅवरकडून महापालिका नोंदणी करुन कर आकारणी करत आहे, याबाबत महापालिकेचे महापाैर नितीन काळजे यांनी करसंकलन कार्यालयास पत्र देवून मागणी केली आहे. महापालिका करसंकलन कार्यालयाने अनधिकृत मोबाईल टाॅवरचा सर्व्हे करुन त्यांची माहिती महापाैरांना सादर केली आहे. यामध्ये मॅगझीन चाैक भोसरी, बोपखेल, दिघी, चिखली, सांगवी, निगडी प्राधिकरण, पिपरीगांव अशा पध्दतीने शहरात तब्बल 16 अनधिकृत मोबाईल टाॅवर आढळून आले आहेत.

दरम्यान, महापालिका करसंकलन कार्यालनाने पालिका हद्दीतील विविध कंपन्याचे मोबाईल टाॅवर कार्यरत आहेत. त्यातील काही मोबाईल टाॅवरची मिळकतीवर कर आकारणी करुन वसुली करण्यात येत आहे. त्यातील तक्रारीनूसार काही मोबाईल टाॅवर मिळकतींवर कर आकारणी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या 16 विभागीय कर संकलन कार्यालय क्षेत्रातील आकारणी न झालेल्या सर्व मोबाईल टाॅवर मिळकतीवर सात दिवसात कर आकारणी करण्याचे आदेश सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. तसेच विभागीय कार्यालय क्षेत्रात कर आकारणी न केलेला एकही मोबाईल टाॅवर शिल्लक राहणार नाही, याशिवाय मोबाईल टाॅवरच्या मिळकतीवर कर आकारणी केल्याचा दाखला देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button