breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरात धुळवड उत्साहात साजरी, लहान मुलांसह तरुणाईने लुटला आनंद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरासह संभाजीनगर परिसरात सर्वत्र होळी उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात पार पडली़. होळीचे पूजन करून आज धुळवडीचा रंग उधण्याचा आनंद नागरिकांनी लुटला. सोसायटया, हॉस्टेल मधील विद्यार्थी, तरूण मंडिळींनी रंगाची उळण करून आनंद लुटला.
काल शहरातील मोकळया जागेत होळी पेटवून सन साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच धुलिवंदनाला सुरूवात झाली़. भोसरीसह, चिखली, पूर्णानगर, संभाजीनगर भागात गल्लोगल्लीत प्रत्येक धुळवड साजरी करण्यात आली.
काही सामाजिक संस्था आणि संघटनांनी पर्यावरण पूरक धुळवड साजरी करण्यावर भर दिला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वतीने नैसर्गीक रंगाचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. परंतु, तरुणाईने पर्यावरण पूरक धुळवड साजरी करण्याला फाटा दिला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button