breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रशियन महिलेवर पोलीस निरीक्षकाचा १२ वर्षांपासून बलात्कार

मुंबई : पोलीस निरीक्षकाने १२ वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप एका रशियन महिलेने केला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पोलीस निरीक्षक हा मागील १२ वर्षांपासून अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार करत आहेत, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. आरोपीपासून पीडित महिलेला एक मुलगा असून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही पीडितेने तिच्या तक्रारीत केला आहे.

पीडिता मूळची रशियाची असून २००३ ला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. इमिग्रेशन कार्यालयात व्हिसा मुदतवाढीसंदर्भात तिची या पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली होती. त्यादरम्यान पोलिसाने तिचे  पारपत्र जमा करून घेतले होते. मात्र अनेकदा मागणी करूनही ते परत केले नाही. तिच्या अडचणीचा फायदा उठवून आणि लग्नाचे आमिष दाखवत मागील १२ वर्षांपासून तिचा छळ करत आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी पोलीस निरीक्षकाचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीशी लागेबांधे असून त्यासंबंधी त्याने एकाची हत्या केल्याचा दावाही तिने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button