breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील सर्व आठवडे बाजार उद्यापासून सुरू राहणार, महापालिकेचा आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील भाजीपाला व फळे विक्री पूर्णतः प्रतिबंध करणेत आला होता. या करीता सर्व आठवडे बाजार शनिवार दिनांक ११०४ / २०२० रोजी ६.०० वाजले पासून मंगळवार दिनांक १४ / ४ / २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत बंद करण्यात आले होते. नागरीकांना फळे भाजीपाला मिळावा याकरीता बंद करण्यात आलेल्या आठवडे बाजार दि. १७ / ४ / २०२० पासून चालु करणेस मान्यता देणेत येत आहे. पुढील आदेश होई पर्यंत आठवडे बाजार खालील अटी / शर्तीस अधिन राहून चालू राहतील, असा आदेश महापालिका प्रशासनाने काढला आहे.

१) प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर देणेत यावेत.

२) सॅनिटायझन टनेलचा वापर करावा.

३) कोरोना कोबीड प्रादुर्भाव रोखणेकामी क्षेत्रिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली सर्वतोपरी काळजी घेणेत यावी.

४) आठवडे बाजार मध्ये एकाच ठिकाणी गर्दी करू नये

५) सोशल डिस्टसिगचे पालन करणे बंधनकार आहे.

६) आठवडे बाजार मध्ये येताना चेहरा झाकने अथवा मास्क वापरणे बंधनकारक आहे.

७) आठवडे बाजार मध्ये येताना व परत गेल्यावर हात स्वच्छ धुवावेत अथवा सनेटाईज करणे आवश्यक आहे.

८) आठवडे बाजार मध्ये ६५ वर्षे पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी व ५ वर्षे पेक्षा कमी वयाच्या मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रवेश वर्जित आहे.

९) आठवडे बाजार मध्ये अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धुंकणे हा दंडणीय गुन्हा आहे.

१०) आठवडे बाजार मध्ये व परीसरात दारू पिण्यास अथवा दारू पिऊन प्रवेश करण्यास मनाई आहे.

११) आठवडे बाजार मध्ये व परीसरात गुटखा खाण्यास अथवा गुटखा खाऊन प्रवेश करण्यास व धुंकण्यास मनाई आहे.

१२) ग्राहकास भाजीपाल्यास हात लावू देऊ नये.

१३) गाळेधारकास स्वतः सेनिटायझरचा वापर करावे.

१४ ) ग्राहकानी बाजारात प्रवेश करताना सेनिटायझरचा वापर व मास्क असेल सोशल डिस्टंसिंग मध्ये असेल, तरच भाजीपाला, फळे व इतर माल द्यावा, कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना म्हणुन शेतकरी आठवडे बाजारामधील स्टॉल मधील ३ / ४ फुटाचे अंतर राखणेबाबत दक्षता घेणेत यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button