ताज्या घडामोडीमुंबई

भिवंडीतील दोन बँकांमधील सर्व कर्मचारी निघाले कोरोनाबाधित

भिवंडी | ठाणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढत चालला असताना भिवंडी शहरातील दोन बड्या बँकांतील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने या दोन्ही बँकांना टाळे लावण्याची वेळ आली आहे.युनियन बँक ऑफ इंडिया आणि भारतीय स्टेट बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव आले आहेत.शहरातील मंडई परिसरात असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अमरदीप यांच्यासह शाखेतील सर्व पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे या बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही शाखाच बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून बँकेबाहेर तशी नोटीस लावून बँकेला टाळे ठोकले आहे. तर दुसरीकडे शहरातील जकात नाक्यावर असलेल्या भारतीय स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांचेही रिपोर्ट पोझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे या बँकेलाही टाळे लावले आहे. उद्या सोमवारी नियमित वेळेत या बँका दुसरे कर्मचारी उपलब्ध करून सुरू केल्या जातील असे या बँकांच्या प्रशासनाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button