breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यमुनानगरच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे माॅनिटर सुरु करा – सुलभा उबाळे

पिंपरी – यमुनानगर मध्ये दीड वर्षापूर्वी बसविण्यात आलेले विदेशी बनावटीचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. यानिमित्ताने महापालिकेचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हे कॅमेरे त्वरीत दुरूस्त करून यमुनानगर पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमे-याचे मॉनिटर सुरू करावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेतर्फे  2016 च्या अखेरीस निगडी – यमुनानगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हे कॅमेरे बसविण्यासाठी 50 लाखाची निविदा काढण्यात आली होती. वैभव एंटरप्रायजेस या ठेकेदारी कंपनीला देखभाल-दुरूस्तीसह हे काम देण्यात आले. विदेशी बनावटीचे कॅमेरे बसविण्यास आपण लेखी विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने विदेशी बॉस्क कंपनीचे कॅमेरे बसविण्याचा अट्टहास करत कॅमेरे चांगले असल्याची हमी दिली आणि ते बसविले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. या कॅमे-यांमुळे परिसरातील चो-या, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीसांना मोठी मदत होत होती.

निगडी पोलीसांनी याबाबत वेळोवेळी कंपनीचे व्यवस्थापक अविनाश बारी यांना सांगितले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आठवडाभरापूर्वी यमुनानगर एलआयसी कार्यालयाजवळ दरोडा पडला. त्यावेळीही चौकशी दरम्यान निगडी पोलिसांना येथील महापालिकेचे कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले. 12 मे रोजी रात्री यमुनानगरमध्ये सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. तेथीलही महापालिकेचे तीन कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांनी सांतिले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीवर कारवाई करून कॅमेरे दुरूस्त करावेत आणि यमुनानगर पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमे-याचे मॉनिटर सुरू करावे. अन्यथा सर्व कॅमेरे महापालिका आपल्या दालनात आणून ठेवण्यात येतील, असा इशारा उबाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button