breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार

अहमदनगर – शरद पोंक्षे यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला. अहमदनगरमध्ये पोंक्षे आले असताना ही घटना घडली. या हल्ल्याच्या वेळी ते गाडीमध्ये नव्हते. हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही.

नगरमध्ये 100 वी अखिल भारतीय नाट्य परिषद होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार परिषद सुरु असताना त्यांची कार ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती त्याच ठिकाणी काही तरुणांनी येऊन दगडफेक केली अशी माहिती दिली जातेय. पण हा हल्ला कुणी केला याची माहिती द्याप मिळू शकली नाही. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अस्पृश्यता निवारणाचं काम मोठं होतं असं वक्तव्य पोंक्षे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button