breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोराेना व्हायरस, पुण्यात चोरले 35 हजारांचे मास्क

पुणे |महाईन्यूज|

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. भारतात सध्या 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी N-95 मास्कची मागणी वाढली आहे. तर, पुण्यात याच कोरोनाचा वापर पैसे कमवण्यासाठी केला जात आहे.

पुण्यात एका नामांकित रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये सुमारे 35 हजार रुपयांचे मास्क चोरल्याचे समोर आले आहे. याआधी बऱ्याच ठिकाणी जास्त किंमतीला मास्क विकत असल्याचे आरोप केले जात आहेत.

कोरेगाव पार्क पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी, शनिवारी रुग्णालयातील दवाखान्यातून मास्क, इंजेक्शन्स, गोळ्या आणि मलम चोरुन नेण्यात आले आहेत, असे सांगितले. या प्रकरणी मेडिकल चालकावर IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button