breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेलं कसं चालतं?

मुंबई | ‘आज के शिवाजी’ या पुस्तकातं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली आहे. हा वाद सध्या वाढला असून सर्वच स्तरावरून यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजप पक्षाने आपली यावर ठाम भूमिका मांडावी अशी मागणी होत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिप्रश्न विचारला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? असा प्रश्न विचारला असून ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले की,’जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही.’ पण यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button