breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शंभर कोटीच्या ठेवीवर डल्ला मारल्याचा माथाडी युनियनचा आरोप

मुंबई – 50 हजार माथाडी कामगारांच्या आयुष्याची पुंजी जमा केलेल्या ठेवीवर राष्ट्रीयकृत बँकेने डल्ला मारल्याचा आरोप माथाडी युनियन ने केला आहे. माथाडी कामगार काम करीत असलेल्या पाच बोर्डातून ठेवण्यात आलेल्या 100 कोटींच्या ठेवी बनावट कागदपञांचा वापर करून या ठेवी परस्पर इतर खात्यात वळती करून घेण्याचा प्रकार बँकेतील अधिकाऱ्यांनी केला आहे. यात घोटाळ्यात शासनाच्या कामगार मंञालयातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय माथाडी कामगार संघटनेने व्यक्त केला असून याची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सरकारच्या शासकिय, निमशासकीय संस्थांच्या करोडो रूपयांच्या ठेवी अनेक राष्ट्रीय बँकेत ठेवल्या जातात. या ठेवींच्या बाबत संबंधीत संस्थांशी पञव्यवहार केल्या शिवाय त्या इतरञ वापरण्याचे अधिकार बँकांना नसताना माथाडी कामगार बोर्डाच्या करोडो रूपायांच्या ठेवींचा बँकांना अपहर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 50 हजार माथाडी कामगारांच्या ग्रँज्यूटी, पी एफ चे पैसे शासनाच्या कामगार बोर्डाकडे जमा केले जातात.

100 करोड रूपयांच्या माथाडी कामगारांच्या ठेवी परस्पर बनावट कागदपञांच्या साह्याने इतर खात्यात वळती करून त्या हडप करण्याचा धक्कादायक प्रकार घ़डला आहे. कामगार बोर्डाच्या खात्यातून बँकांच्या मँनेजरने अशा पध्दतीने करोडो रूपयांचा अपहर केल्याप्रकरणी यात शासनाच्या कामगार खात्यातील अधिकार्यांचाही हात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शासन दरबारी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्यकारी आध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button