breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत दहा हजाराची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पडकले

पिंपरी |महाईन्यूज|

दहा हजाराची लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मोशी येथे करण्यात आली.

भरत सोनू बांगर (वय 35 ) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. बांगर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी बांगर यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील 10 हजारांची रक्कम स्वीकारताना बांगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री रंगेहाथ पकडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button