TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन सावधान, गुन्हा दाखल होईल; 1 जानेवारी कोरेगाव भीमा मानवंदना

१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडु देण्यासाठी छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष देणार आहेत. व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर १ जानेवारी मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाज विघातक पोस्ट , मजकुर , व्हिडिओ, आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची नजर असणार आहे. अश्या पोस्टमुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरुन प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप अ‍ॅडमिन व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला त्यासंधर्भात तशा लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबतीत ग्रुप अ‍ॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button