breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजधानीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

नवी दिल्ली| सध्या चीन, दक्षिण कोरियामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्याचबरोबर तेलंगणातूनही एक रुग्ण कोरोनाने पीडित आढळून आला आहे.

दिल्लीत जो कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो इटलीतून आला होता, असे सांगण्यात येते. दुसरा व्यक्ती दुबईतून आला आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना विषाणूचे ३ रुग्ण समोर आले होते. कोरोना पीडित रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सध्या दोन्ही रुग्णांची स्थिती स्थिर आहे.

यापूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या लोकांना कोणालाही भेटण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर परदेशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button